04 December 2020

News Flash

विद्यार्थ्यांना शिकवणीबाहेर विवस्त्र उभे करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

ओरडूनही परिणाम होत नसल्याने त्यांना ही शिक्षा केल्याचे शिकवणी शिक्षकाने पोलिसांना सांगितले.

मालाड मालवणी येथील एका खासगी शिकवणीच्या बाहेर दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना विवस्त्र अवस्थेत उभे केल्याने मुंबईतील मालवणी पोलिसांनी खासगी शिकवणी चालक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन विद्यार्थ्यांना विवस्त्र उभे केल्याचा व्हिडीओ सर्वत्र समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार नसल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली.

मालाड मालवणी येथील गेट क्रमांक पाच येथील एका खासगी शिकवणीच्या बाहेर दोन अल्पवयीन विद्यार्थी विवस्त्र अवस्थेत उभे राहून रडत असल्याचा व्हिडीओ शनिवारी ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून प्रसारित झाला होता. सर्वत्र पोहोचलेल्या या व्हिडीओची गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांनी शनिवारी दुपारी संबंधित खासगी शिकवणी चालक आणि शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी मस्तीखोर असून अभ्यास करीत नसल्यामुळे त्यांच्या पालकांनीच विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी शिकवणीच्या शिक्षकांना सांगितले होते. त्यांच्यावर ओरडूनही परिणाम होत नसल्याने त्यांना ही शिक्षा केल्याचे शिकवणी शिक्षकाने पोलिसांना सांगितले.ओरडूनही परिणाम होत नसल्याने त्यांना ही शिक्षा केल्याचे शिकवणी शिक्षकाने पोलिसांना सांगितले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षेबाबत त्यांच्या पालकांची कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसांकडे आलेली नसून प्रसारित झालेल्या व्हिडीओमुळे या प्रकरणाची दखल घेत मालवणी पोलिसांनी बाल संरक्षण कायद्याअंतर्गत ही कारवाई केली. यात शिक्षक व शिकवणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मििलद खेतले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 2:33 am

Web Title: take action on teacher who molested student in malad
टॅग Teacher
Next Stories
1 नाटकाच्या टेम्पोला अपघात; एक ठार
2 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, हत्येप्रकरणी दोघांना अटक
3 मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
Just Now!
X