राज्य सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे; १७ महानगरपालिका क्षेत्रांत निर्बंध कायम

मुंबई : टाळेबंदीच्या चौथ्या पर्वात राज्य सरकारने लाल क्षेत्राबाहेर शिथिल के लेले निर्बंध आज, शुक्रवारपासून अमलात येत आहेत. यानुसार १७ महानगरपालिका, तीन नगरपालिका वगळता अन्यत्र रिक्षा, टॅक्सीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याबरोबरच सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…

टाळेबंदीला मुदतवाढ देताना राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे नवीन आदेश तयार के ले आहेत. हरित, लाल आणि नारिंगी या तीन क्षेत्रांऐवजी लाल आणि उर्वरित अशा दोन क्षेत्रांमध्येच विभागणी करण्यात आली. लाल क्षेत्रात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल करताना त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

लाल क्षेत्रे कोणती?

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महानगरपालिका. कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर नगरपालिका.

 ६० टक्के  भाग मोकळा..

लाल क्षेत्रात १७ महानगरपालिका हद्दींचा समावेश होतो. राज्याच्या ३५ ते ४० टक्के  भाग हा लाल क्षेत्रात मोडतो. उर्वरित ६० टक्क्यांच्या आसपास भागांमध्ये व्यवहार सुरू होतील. यापैकी काही शहरांमध्ये आधीच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु गर्दी होत असल्याने काही शहरांमधील दुकाने स्थानिक प्रशासनाने बंद केली होती. निर्बंध शिथिल केल्यावर गर्दी झाल्यास दुकाने वा व्यवहार बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

काय सुरू होणार?

’बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

’दुचाकी (फक्त चालक), रिक्षा किं वा तीन चाकी (चालक अधिक दोन प्रवासी), चार चाकी वाहने (चालक अधिक दोन प्रवासी) यांना परवानगी

’मद्यविक्रीची दुकाने

’क्रीडा संकु ले आणि स्टेडियम – प्रेक्षकांना परवानगी नाही

’सामाजिक अंतर ठेवून व्यायाम करण्यास परवानगी.  ई कॉमर्स

हे बंद राहणार 

केशकर्तनालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमागृहे, उपाहारगृहे, सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सारे व्यवहार.

१ जूननंतरही राज्यांतर्गत रेल्वेप्रवास बंदच

मुंबई: येत्या १ जूनपासून २०० रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. त्याचे आरक्षण गुरुवारपासून सुरू झाले. मोठय़ा संख्येने प्रवाशांनी तिकीटांचे आरक्षण के ले. परंतु, महाराष्ट्रात राज्यांतर्गत प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार नाही. या रेल्वे गाडय़ांमधून राज्यांतर्गत प्रवासाला बंदीच असावी, अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार राज्यांतर्गत प्रवास बंदीचे आदेश रेल्वे मंत्रालयाने तात्काळ काढले.

या आदेशानुसार, ज्या प्रवाशांनी १ जूननंतरच्या रेल्वेगाडय़ांचे राज्यांतर्गत प्रवासासाठी आरक्षण के ले असेल, त्यांचे तिकीट रद्द करण्यात यावे. त्यांना तिकीटाचा पूर्ण परतावा दिला जाणार आहे. याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवण्यात यावा. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून एकू ण १६ गाडय़ा सुटणार आहेत. तर मुंबईच्या दिशेने सात रेल्वे गाडय़ा येतील. या सर्व गाडय़ा राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरून येणाऱ्या आहेत. यातील काही गाडय़ांना महाराष्ट्रातील स्थानकांमध्ये थांबा दिलेला आहे. या गाडय़ांमध्ये प्रवाशाने मुंबई ते राज्यातील एखाद्या स्थानकापर्यंतचे तिकीट काढले असेल, तर ते तिकीट रद्द होणार आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.