नाइट फ्रँकने केलेल्या अॅटिट्युड सर्व्हेनुसार भारतातील १४ टक्‍के अतिउच्च संपत्तीधारक व्यक्ती (अल्ट्रा-हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स) २०१९ मध्ये सुवर्णसंपदा श्रेणीतील त्यांच्या गुंतवणुकीत वाढ करतील अशी शक्यता आहे. ही गुंतवणूक २०१८ सालाच्या तुलनेत ३% अधिक असेल.

जगभरात झालेल्या या पाहणीमध्ये भाग घेतलेल्यांपैकी २० टक्के जण म्हणाले की, ते २०१९ मध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढवणार आहेत. २०१८ मध्ये ११ टक्के लोकांनी सोन्यातील गुंतवणूक वाढवली होती. त्या तुलनेत ही टक्केवारी अधिक आहे. यूएचएनडब्ल्यूआय वर्गाने सोन्यामध्ये गुंतवणुकीप्रती दाखवलेल्या सकारात्मक दृष्टिकोनात आशियामध्ये वाढ झाली आहे. २५ टक्के व्यक्तींना यात वाढ अपेक्षित आहे, तर १९ टक्क्यांनी २०१९ मध्ये वाढ होईल असे सांगितले. २०१९ मध्ये एक संपदाश्रेणी म्हणून सोन्याकडे बघण्याची गुंतवणूकदारांची भावना काय आहे हे जाणून घेण्यासाठी नाइट फ्रँकने हे सर्वेक्षण केले.

“जागतिक स्तरावर सोन्यावर आधारित बुलियन हा नेहमीच गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय समजला जातो. सोन्याप्रती सांस्कृतिक जिव्हाळा असलेल्या देशांत सोन्यामध्ये नव्याने एक संपदाश्रेणी म्हणून रस घेतला जाऊ लागला आहे. सर्व गुंतवणुकींप्रमाणे सोन्यामध्येही चढउतार येतात, पण तरीही ते एकंदर स्थिर राहिले आहे. दीर्घकाळापासून या संपदाश्रेणीकडे काहीशा अतिशयोक्त दृष्टिकोनातून बघितले जात आहे. भारत हा सोन्याचा सर्वांत मोठा ग्राहक आहे, पण ही खरेदी किरकोळ कारणांसाठी अलंकारांच्या स्वरूपात झालेली आहे. मात्र, अलीकडील काळात गुंतवणूकदार सोने व रोखे खरेदी करताना आम्हाला दिसत आहेत आणि हा प्रवाह पुढे जाणार आहे. या संपदाश्रेणीतील गुंतवणुकीकडे आशेने बघितले जाऊ लागले असताना अक्षय्यतृतीयेच्या मंगल प्रसंगी देशातील अतिश्रीमंत व्यक्ती गुंतवणूक आणि वापर या दोन्ही उद्देशांनी सोनेखरेदी करतील, अशी अपेक्षा आहे, ” असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशीर बैजाल म्हणतात.

अॅटिट्यूड सर्व्हेतील प्रमुख निष्कर्ष:

सोन्याकडे संपत्तीचे वितरण: जागतिक सरासरी (२ टक्के) आणि आशियातील सरासरी (३ टक्के) यांच्या तुलनेत भारतातील यूएचएनडब्ल्यूआय वर्ग सोन्यात अधिक गुंतवणूक, एकूण गुंतवणुकीच्या ४ टक्के, करतो.

२०१९ मध्ये सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण बदलणे अपेक्षित: भारतीय यूएचएनडब्ल्यूआय वर्गातील १४ टक्के व्यक्ती सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे अपेक्षित (२०१८ मध्ये हा आकडा ११ टक्के होता)

चीनमधील यूएचएनडब्ल्यूआय वर्गापैकी ५५ टक्के यावर्षी सोन्यातील गुंतवणूक वाढवणार (२०१८ मधील आकडा ४५ टक्के); जागतिक व आशियाई सरासरी वाढवण्यामध्ये या देशाचे प्रभावी योगदान

जागतिक स्तरावर यूएचएनडब्ल्यूआय वर्गापैकी २० टक्के सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणार (२०१८ मध्ये ११ टक्के). आशियामध्ये २५ टक्के यूएचएनडब्ल्यूआय सोन्यातील गुंतवणूक वाढवणार (२०१८ मध्ये १९ टक्के).