News Flash

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची करोनावर मात

रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करणार

संग्रहीत

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी करोनावर मात केली असून, त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. उद्या (रविवार दि. ८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता ते रुग्णालयातून घरी परतणार आहेत.

रामदास आठवले यांनी करोनावर मात केल्याबद्दल रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करून, त्यांचे अभिनंदन व स्वागत करणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना’ चा नारा दिला होता. मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांनाच करोनाने गाठले होते. दि. २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हा पासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते.

११ दिवस उपचार घेतल्यानंतर घेत रामदास आठवले यांनी करोनावर मात केली आहे. उद्या ते बांद्रा येथील ‘संविधान’ या त्यांच्या निवासस्थानी परतणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 5:40 pm

Web Title: union minister of state ramdas athawale defeated corona msr 87
Next Stories
1 १९० कोटींच्या कंत्राटासाठी फेरनिविदा?
2 शिवाजी पार्क मैदानात सापांचा सुळसुळाट
3 बेस्टच्या ताफ्यात एसटीच्या अस्वच्छ गाड्या