संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कोणतेही कारण न देता यंदा होणाऱ्या परीक्षांची अधिसूचना पुढे ढकलली आहे. २३ एप्रिल रोजी ही अधिसूचना जारी करण्यात येणार होती.
यूपीएससीच्या नागरी सेवा, परराष्ट्र सेवा व वन सेवा यांच्या प्राथमिक परीक्षांची अधिसूचना वेळापत्रकाप्रमाणे शनिवारी, २३ एप्रिल रोजी जाहीर होणे क्रमप्राप्त होते. मात्र, काही कारणास्तव ही अधिसूचना जारी करणे पुढे ढकलण्यात आल्याचे यूपीएससीतर्फे सोमवारी सांगण्यात आले.
First Published on April 26, 2016 3:11 am