13 August 2020

News Flash

अधू दृष्टीचा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

दहावीच्या परीक्षेसाठी मोठय़ा अक्षरांची प्रश्नपत्रिका

(संग्रहित छायाचित्र)

अधू दृष्टी, तसेच ‘सेरेब्रल पाल्सी’चा त्रास असलेल्या सिंधुदुर्ग येथील विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेसाठी मोठय़ा अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक शाळा परीक्षा मंडळाने (एसएससी) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे असा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांनी नियोजित मुदतीत अर्ज केल्यास त्यांनाही मोठय़ा अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्यात येईल, असे परीक्षा मंडळाने प्रामुख्याने स्पष्ट केले. त्यामुळे ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेंगुर्ला येथील या विद्यार्थिनीला अधू दृष्टीचा त्रास आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय समितीकडून तिला दोन वेळा त्याबाबतचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. त्यामुळेच दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मोठय़ा अक्षरात उपलब्ध करण्याची मागणी तिने परीक्षा मंडळाकडे केली होती. मात्र ती अमान्य करण्यात आल्याने तिने पालकांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी या विद्यार्थिनीला मोठय़ा अक्षरांतील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आदेश मंडळाच्या कोकण विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा मंडळाच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने परीक्षा मंडळाचे म्हणणे मान्य करत याचिका निकाली काढली.

झाले काय? : अधू दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठय़ा अक्षरातील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारचा अध्यादेश असल्याची बाब या विद्यार्थिनीच्या वकिलांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी शासनाने त्याबाबतचा अध्यादेश काढला होता. असे असतानाही या विद्यार्थिनीला भिंगाचा वापर करण्याचा सल्ला परीक्षा मंडळाने दिल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने परीक्षा मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 1:08 am

Web Title: visual impairment students question paper in uppercase for the class x exam abn 97
Next Stories
1 काश्मिरी विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणाबाबत संभ्रम
2 प्राध्यापक प्र. ना. परांजपे यांना ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’
3 आघाडीचे सबुरीचे धोरण
Just Now!
X