मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ पासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर असेल. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर; तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील सर्व अप-डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच जलद मार्गावरील लोकलला फलाट उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार असून तेथूनच चर्चगेटकरिता चालविण्यात येणार आहेत.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या लोकल फेऱ्या रद्द

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील दुपारी १.५२ सीएसएमटी – गोरेगाव लोकल, सकाळी १०.३७ ची पनवेल – गोरेगाव लोकल, दुपारी १२.५३ ची गोरेगाव- सीएसएमटी लोकल, दुपारी १२.१४ ची गोरेगाव – पनवेल लोकल रद्द करण्यात येणार आहे. चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटवरून सुटणारी दुपारी १२.१६ आणि दुपारी २.५० वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल. बोरिवलीवरून दुपारी १.१४ आणि दुपारी ३. ४० वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात येणार आहे. त्याऐवजी विरार ते चर्चगेट दुपारी १.४५ आणि दुपारी ४.१५ वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावतील. तसेच ब्लॉकदरम्यान अप- डाऊन मार्गावरील मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील.