scorecardresearch

Premium

देशभरात २३ वंदे भारतचे जाळे

पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

vande bharat express network in india
वंदे भारत एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. देशभरात सध्या १८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून मंगळवारी आणखीन पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात २३ वंदे भारत धावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथील राणी कमलापती स्थानकातून पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यामध्ये राणी कमलापती (भोपाळ) ते इंदौर, भोपाळ ते जबलपूर, रांची ते पाटणा, धारवाड ते बंगळूरु आणि मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे चेअर कारचे साधारण तिकीट दर १,४३५ रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्हचे तिकीट दर २,९२१ रुपये असे असणार आहेत.

jaylalita tn
…जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास
Lalu prasad yadav jitan manjhi
लालू प्रसाद यादव यांच्याकडून बहुमताची जुळवाजुळव; जितन मांझींच्या मुलाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
Criminal order against Rahul Gandhi on the charge of inciting the crowd
राहुल गांधींवर गुन्ह्याचे आदेश; गर्दीला चिथावणी दिल्याचा आरोप, सरमांकडून ‘नक्षलवादी’ म्हणून उल्लेख
Himanta Biswa Sarma has directed criminal case be filed against Congress leader Rahul Gandhi
गुवाहाटीत काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये झटापट; मुख्यमंत्र्याकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

पावसाळय़ातील वेळापत्रक

गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातील तीन दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२०  वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत.

पावसाळय़ातील वेळापत्रकामुळे वेगमर्यादा वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होण्याची शक्यता होती. मात्र मान्सून वेळापत्रकामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला असून वेगमर्यादा अद्याप निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सीएसएमटी-दिवा १०५ किमी प्रति ताशी वेग, दिवा ते रोहा ११० किमी प्रति ताशी वेग असण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 23 vande bharat express network across the country mumbai print news zws

First published on: 27-06-2023 at 02:13 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×