मुंबई : मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. तसेच वसईमध्ये भव्य रेल्वे टर्मिनल उभारले जाणार आहे, अशी माहिती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरून दिली. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभारही मानले.

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून दररोज सुमारे ३,२०० लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. यातून सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करताता. तर भविष्यात प्रवाशांची संख्या वाढणार असून त्याकरीता केंद्र सरकारने ३०० नव्या लोकल सुरु करण्याचे ठरवले आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारले जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे.

हेही वाचा >>>बेस्टचा स्वस्त प्रवास कायम

मुंबई महानगरात दररोज मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर १,४०६ फेऱ्या धावतात. यामधून अनुक्रमे ४० आणि ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, या प्रवाशांसाठी ३०० अतिरिक्त लोकल सुरू केल्या जातील. या प्रकल्पांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होईल आणि एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन योजनांना मंजुरी

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत तीन मोठ्या योजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. बंदरे जोडणीला बळ देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबई कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे.