मुंबई : चॉकलेटचे आमिष दाखवून ७३ वर्षीय वृद्धाने आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गोरेगाव पूर्व येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अश्लील चित्रफीत दाखवून मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – VIDEO: “यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का?”, अजित पवार अधिवेशनात संतापले, म्हणाले…

हेही वाचा – “अर्थसंकल्पात ४० आमदारांचे लाड पुरवण्यात आले”, एकनाथ खडसेंच्या विधानावर सत्ताधारी मंत्र्यांचा कडाडून आक्षेप; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने याप्रकरणी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आरोपीच्या घरी थंड पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखविले. तिला अश्लील चित्रफीत दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने जोरात ओरडाओरड केली. त्यावेळी आरोपीने हा प्रकार कोणालाही सांगू नको, असे धमकावले आणि तिला सोडले. याबाबत पीडित मुलीच्या आईला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी विनयभंग व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानतंर मंगळवारी सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली.