scorecardresearch

“अर्थसंकल्पात ४० आमदारांचे लाड पुरवण्यात आले”, एकनाथ खडसेंच्या विधानावर सत्ताधारी मंत्र्यांचा कडाडून आक्षेप; म्हणाले…

यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.

Legislative Council eknath khadse speech
फोटो लोकसत्ता ग्राफीक्स टीम

विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. अर्थसंकल्पात शिंदे गटाच्या ४० आमदारांचे पुरवण्यात आले, असं ते म्हणाले. मात्र, खडसेंच्या या विधानावर सत्तधाऱ्यांनी आक्षेप घेतला. यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. अखेर विधानपरिषदेच्या सभापतींनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – VIDEO: अजित पवार मंत्र्यांवर संतापले, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”

नेमकं का घडलं?

अर्थसंकल्पावर बोलताना एकनाथ खडसे यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्वात जास्त लाड शिंदे गटाच्या ४० आमदारांचे पुरवण्यात येत आहे. इतर राज्याच्या तुलनेत त्यांच्या मतदारसंघात अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. अनेक प्रकल्प घोषित करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पद्वारे ४० आमदारांचे लाड पुरवण्याचं काम करण्यात आलं आहे, असे ते म्हणाले. तसेच अर्थसंकल्पात शिंदे गटाच्या आमदारांना झुकतं माप दिल्यानं भाजपाचे अनेक आमदार नाराज आहे. ते खासगीत त्यांची नाराजी बोलून दाखवतात. आम्हाला १० कोटी देतात आणि शिंदे गटाच्या आमदारांना २० कोटी देतात, असं ते सांगतात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – आसामचे मुख्यमंत्री आणि नारायण राणेंच्या ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांची भाजपावर टीका; नेमकं काय म्हणाले?

खडसेंच्या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप

एकनाथ खडसेंच्या या विधानावर भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आक्षेप घेतला. कोणतेही आमदार प्रस्ताव घेऊन मंत्र्याकडे आले, तर मंत्री त्यावर शेरा लिहितात. हे एकनाथ खडसे यांना माहिती आहे. तेसुद्धा मंत्री राहिले आहे. त्यामुळे ४० आमदारांचे लाड पुरवले जाते, हे खडसे यांचं विधान अत्यंत चुकीचं असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – “राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’…”, शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची टीका; शिंदे गटाला इशारा देत म्हणाले…

दरम्यान, यावेळी इतर आमदारांनीही घोषणाबाजी केल्याने अखेर विधानसभेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी सर्वांना शांत केले. तसेच एकनाथ खडसे यांचे भाषण होईपर्यंत कोणीही बोलू नये, अशी सूचना केली

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 12:26 IST