मुंबईः वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात मोटरगाडीने दिलेल्या धडकेत ४६ वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला. मृत व्यक्ती अंध असून रस्ता ओलांडत असताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी ७४ वर्षीय चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्वर खान (४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जन्मापासून अंध असून खार पूर्व येथे राहात होते. गौसिया मशीद परिसरात भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह चालयचा. गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अन्वर हे खेरवाडी पुल परिसरात रस्ता ओलांडत असताना त्यांना मोटरगाडीने धडक दिली. त्यात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तत्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयात आणण्यापूर्वीच अन्वर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हेही वाचा… पंधरा दिवसात दोनदा पक्षप्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी याबाबतची माहिती अन्वर यांच्या कुटुंबियांना दिली. याप्रकरणी अन्वर यांचा भाऊ सरवर खान यांच्या तक्रारीवरून मोटरगाडी चालक क्लेरेन्स फणसेका (७४) यांच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.