मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ५७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत सहा कोटी रुपये आहे.

आरोपी व्हेनेझुएचा नागरिक आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला १६ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ५७ कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

हेही वाचा – विधी शाखेच्या प्रश्नपत्रिकेवरील गुणांची बेरीज ७५ ऐवजी ३७, मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा गोंधळाची मालिका सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ६२८ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे सहा कोटी २८ लाख रुपये आहे. चौकशीत त्याला मुख्य आरोपीने कोकेन व विमानाचे तिकीट दिले होते. ते मुंबईत वाहून आणण्यासाठी पैसे देण्याचे कबूल केले होते. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला होता.