मुंबई: पायधुनी येथील व्यापाऱ्यांची फसवणूक करून ७६ लाख रूपये चोरणाऱ्या त्रिकुटाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. इंदरा कुमार उकाराम चैहान (२४), भैरवसिंग जब्बारसिंग जोधा (२६), नरेंद्र सिंग मनोहर सिंग सोलंकी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून ते भाईंदर, कांदिवलीतील रहिवासी आहेत.

पायधुनी येथील व्यापारी मोमहारुफ हाजी मदनी कपाडिया (३१) यांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिकुटाने
डिसेंबर २०२२ ते दिनांक २५ मे २०२३ दरम्यान व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. कपाडिया यांनी विश्वासाने पाठवलेली ७६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चौहानला पाठवली. त्याने रक्कम हैदराबाद येथे ठरलेल्या ठिकाणी न देता फसवणूक केली. याबाबत व्यापाऱ्याला समजताच, त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.

हेही वाचा >>>ग्रामोद्योग वस्तूविक्रीसाठी मोठय़ा शहरांत जागा; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरु केला. तांत्रिक तपासात आरोपी भाईंदर येथून आले असल्याची माहिती मिळाली. पुढे, हाच धागा पकडून पथकाने चौहानला ताब्यात घेतले. चौहान याने नरेन्द्रच्या सांगण्यावरून रक्कम घेतल्याचे सांगताच पथकाने राजस्थान मधून त्याला अटक केली. नरेंद्रच्या चौकशीदरम्यान भैरवसिंगचा सहभाग समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.