लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः स्वाक्षरी आणि हातावर गोंदवलेला बदाम आणि क्रॉसच्या आधारे १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रफी अहमद किरवाई मार्ग (आरएके) मार्ग पोलिसांना यश आले. आरोपी स्वतःचे आडनाव बदलून वावरत होता. आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र ऊर्फ मुदलीयार (६३) असे आहे. फरार आरोपीचे छायाचित्र पोलिसांकडे उपलब्ध नव्हते. तसेच तो वारंवार पत्ते बदलून कल्याण, माहीम, भांडूप आदी परिसरात राहात होता. कधीकधी तो कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत होता. तेथील स्थानिक रहिवासीही त्याच्याबाबत माहिती देत नव्हते. आरोपी मृत झाला अथवा तामिळनाडूत पळून गेल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आरोपीला अटक करणे कठीण झाले होते. अटक आरोपीच्या उजव्या हाताच्या मनगटावर बदाम व क्रॉस गोंदवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. तसेच त्याच्या स्वाक्षरीची प्रतही पोलिसांना सापडली. त्या माहितीच्या आधारे आरोपी मुंबई दर्शन मार्गांवर चालकाचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. आरोपी देवेंद्रऐवजी मुदलीयार आडनावाने वावरत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीविरोधात भांडूप, ॲन्टॉप हिल, अहमदाबाद येथील पोखारा व शीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

आणखी वाचा- मुंबईमध्ये यंदाचे आठवे अवयवदान यशस्वी, दोघांना मिळाले जीवदान

आरोपी अत्यंत चतुर असल्याने संपर्क साधून त्याला पकडणे कठीण होते. आरोपीला संशय आला असता तर तो पळून गेला असता. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पथकाने सामान्य नागरिक असल्याचे भासवून कुटुंबासमवेत मुंबई दर्शन करण्यासाठी दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला. या सहलीसाठी जुना अनुभवी चालक म्हणून त्यांनी देवेंद्रची मागणी केली. ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयातील संबंधितांनी त्याला बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांना विश्वासात घेऊन खटल्याची माहिती देण्यात आली आणि फरार आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी स्वाक्षरी आणि हातावर गोंदवलेल्या बदाम आणि क्रॉसवरून आरोपीची ओळख पटली. आरोपीने पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिवासाच्या कागदपत्रावर आडनावात देवेंद्रऐवजी मुदलीयार असा बदल केलेचे तपासाच आढळले.