पहिल्याच दिवशी ३४१ जणांवर कारवाई
रेल्वेमार्गावर दरवर्षी होणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक अपघातांपैकी जवळपास ५० टक्के अपघाती मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आता रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहन करण्यापासून रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत अनेक उपाय या मोहिमेदरम्यान राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल ३४१ जणांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण मृत्यूंपैकी ४६४३ मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत; तर ११४५ जण या चार वर्षांत जखमी झाल्याची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्यानंतर मृत्युमुखी पडण्याची शक्यता जास्त असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते. ‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आता मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी एकत्रितपणे मोहीम राबवण्यास सुरुवात केली रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना सहा महिने तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू
रेल्वेमार्गावर दरवर्षी होणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक अपघातांपैकी जवळपास ५० टक्के अपघाती मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात.
Written by रत्नाकर पवार

First published on: 10-12-2015 at 05:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against those who cross track