मुंबई : ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपत आला तरी तेथील रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्री आणि माध्यम प्रभावकांची वाढलेली गर्दी आणि त्यांची फॅशन यावरून वाद सुरूच आहे. अभिनेत्री नंदिता दासच्या एका पोस्टमुळे ‘कान’ हा चित्रपट महोत्सव आहे की कपड्यांचा? असा वाद सुरू झाला होता. आता कोणी कितीही म्हटले तरी हा चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे, अशा ‘कान’पिचक्या देत अभिनेत्री रिचा चढ्ढानेही या वादात उडी घेतली आहे.

हेही वाचा >>> “तो सगळ्यांशी खूप..”; कॅमेऱ्याच्या मागे सलमान खानची वागणूक नेमकी कशी असते? कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली,…

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

गेल्या आठवड्यात फ्रान्समध्ये सुरू झालेल्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे भारतीय अभिनेत्रींच्या रेड कार्पेटवरील फॅशनची चर्चा झाली. एकही वर्ष न चुकता ‘कान’वारी करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनपासून ते सारा अली खान, अदिती राव हैदरी, सनी लिऑन अशी पहिल्यांदाच या महोत्सवात रेड कार्पेटवर पदार्पण केलेल्या अभिनेत्रींचीही एकच गर्दी यंदा अनुभवायला मिळाली. याचबरोबरीने पहिल्यांदाच मोठ्या संख्याने भारतीय माध्यम प्रभावकही यावर्षी कान महोत्सवाला हजर राहिले होते. त्यांच्याही रेड कार्पेटवरील फॅशनची अतोनात प्रसिध्दी झाली. एरव्ही एखाद-दोन अभिनेत्रींच्या फॅशनपुरती आणि खरेतर आपापल्या चित्रपटांच्या प्रसिध्दीसाठी म्हणून ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्या भारतीय कलाकारांची प्रसिध्दी हा कौतुकाचा विषय ठरतो. यंदा कोण कोण रेड कार्पेटवर कसे टेचात वावरले यावरच चर्वितचर्वण झाले. त्यात ऐश्वर्याने रेड कार्पेटवर परिधान केलेल्या हुडी पध्दतीच्या ड्रेसने फॅशनच्या चर्चेला एकच हवा दिली. त्यामुळे एकंदरीतच सध्या ‘कान’ महोत्सवाला उपस्थित असलेले भारतीय कलाकार आणि माध्यम प्रभावकांची गर्दी हे सगळेच विविध कंपन्यांच्या वितरण – प्रसिध्दीचे व्यासपीठ ठरले की काय? असा प्रश्न अभिनेत्री रिचा चढ्ढाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>> आर्यन खान दिग्दर्शित ‘स्टारडम’ वेब सीरिजचा हिरो निश्चित; ८०० ऑडिशन्सनंतर ‘या’ कलाकाराची केली निवड

रिचा चढ्ढाने याआधी दोनदा तिच्या चित्रपटांच्या प्रसिध्दीकरता आणि तिला मिळालेल्या पुरस्काराकरता ‘कान’ महोत्सवाला हजेरी लावली आहे. आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने या महोत्सवात उपस्थित राहणे आणि इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसमोर पुरस्कार स्वीकारणे यासारखा अनुभव नाही. तो या महोत्सवातला खरा आनंद आहे, शेवटी हा चित्रपटांचा महोत्सव आहे, असे सांगत रिचाने या एकूणच रेड कार्पेटवरच्या गर्दीला चित्रपटांशी काही देणे-घेणे नसल्याबाबत टीका केली आहे.

वाद थांबवण्याचे नंदिता दासचे आवाहन

ऐश्वर्या राय बच्चनचा हुडी ड्रेस आणि सारा अली खानचा आधुनिक पध्दतीने नेसलेल्या साडीतला लूक यावरून एकाच वेळी कौतुक आणि टीका समाजमाध्यमांवरून झाली. ऐश्वर्याचा ड्रेस सावरण्यासाठी दिमतीला असलेल्या माणसांवर टीका करत ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अशा प्रकारच्या विचित्र फॅशनवर टीका केली होती. ही टीका थेट ऐश्वर्यावर आहे, असा समज झाल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त झाली. तेव्हा विवेक यांनी आपण ऐश्वर्याबद्दल नव्हे तर या एकूणच पध्दतीवर टीका केली होती, असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. तर ‘कान’ हा काही कपड्यांचा महोत्सव नाही, तो चित्रपटांचा महोत्सव आहे असे सांगत नंदिता दासने आपली कान महोत्सवातील साडी नेसलेली काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकली होती. त्यावरूनही देशभरात एकच वाद सुरू झाला. ‘मी टाकलेल्या पोस्टवरून इतका मोठा वाद निर्माण होईल असे वाटले नव्हते. कान महोत्सव फक्त चित्रपटांचा असतो असे म्हणताना त्यात या महोत्सवाच्या निमित्ताने देशोदेशीचे चित्रपटकर्मी, लेखक, चित्रपट प्रेमी यांच्याशी होणारी भेट-चर्चा आणि तो माहौल असा अर्थ मला अभिप्रेत होता. त्याऐवजी भलताच वाद सुरू झाला’, असे सांगत आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे आवाहन नंदिता यांनी पुन्हा एकदा केले.