‘वेदान्त फॉक्सकॉन’सह बरेच प्रकल्प परराज्यात गेल्याने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. हा घटनाक्रम ताजा असताना अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ येथे ही भेट झाली आहे.

गौतम अदाणी यांनी अशापद्धतीने राज ठाकरेंची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे.

हेही वाचा- दोन दुकानात लुटमार प्रकरण: आरोपी केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक कोर्टात हजर

दुसरीकडे, धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रोजेक्ट अदाणी यांच्या कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी अदाणी हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असे सांगितले जात आहे. पण गौतम अदाणी आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

हेही वाचा- “जर कुणी जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला, तर…,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील एका कार्यक्रमालाही गौतम अदाणी यांनी हजेरी लावली होती. यानंतर आज अदाणी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.