मुंबईच्या कांदिवली परिसरात हिरानंदानी इस्टेट सोसायटीने बोगस लसीकरणाची तक्रार केल्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील आदित्य कॉलेजमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. कांदिवली येथे लसीकरणादरम्यान घोटाळा केलेल्या टोळीनेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विश्वस्त यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. महाविद्यालयाने यासंदर्भात निवेदन काढून माहिती दिली आहे.

३ जून रोजी आदित्य कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या जनसंपर्क विभागात कार्यरत राजेश पांडे यांच्या मार्फत याचे आयोजन करण्यात आले होते. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातर्फे हे शिबिर असणार असल्याचे पांडे याने महाविद्यालयाला सांगितले. महाविद्यालयाने सर्व आवश्यक परवानग्या घ्याव्यात आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण असे पांडे याने सांगितले होते. आदित्य महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हिताकरता हे शिबिर घेण्याचा निर्णय घेतला असे कॉलजचे म्हणणे आहे.

मुंबईत लसीकरण घोटाळा, मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले पोलीस; चौघांना अटक

लसीकरणानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यानंतर मुंबईच्या कांदिवली परिसरातील हिरानंदानी सोसायटीमधील लस घोटाळ्यामध्ये सामील असलेला राजेश पांडे हाच व्यक्ती असल्याचे समजल्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

आदित्य कॉलेजच्या बोरिवली कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरात सुमारे २१३ जणांनी लस घेतली होती. कांदिवलीतील लस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी ४ जणांना अटक केली होती. शनिवारी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या टोळीने शहरात नऊ ठिकाणी लसीकरण शिबिरांद्वारे नागरिकांना लाखो रुपयांना फसविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कांदिवली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात टोळीने लसकुप्या वैध मार्गाने किंवा अधिकृत वितरकाकडून घेतलेल्या नाहीत, अशी माहितीही पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.

अटक केलेला आरोपी महिंद्र प्रताप सिंह लस शिबिराची व्यवस्था करत असे. आरोपी संजय गुप्ता लसीकरणाच्या दिवशी तेथील कामकाज सांभाळत असे. इतर दोन आरोपी चांदसिंग आणि नितीन मोड यांनी रुग्णालयांमधून कोविन अ‍ॅप आयडी चोरुन प्रमाणपत्रे तयार करण्याचे काम करत होते असे पोलिसांनी सांगितले.

लस घोटाळ्यात डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचारी?

चित्रपट कंपन्यांतही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच टोळीने वांद्रे पश्चिाम येथील ‘टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड’ आणि अंधेरी येथील ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ या दोन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर आरोपी संजय गुप्ता याच्या ए. पी. इव्हेन्ट्स कंपनीने आयोजित केले होते. कांदिवली प्रकरणात गुप्ताचे नाव पुढे येताच टीप्स आणि मॅचबॉक्स कंपन्यांनी खार, वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. टीप्स कंपनीतील ३६५ आणि मॅचबॉक्स कंपनीतील १५१ जणांनी लस घेतली. त्यासाठी प्रत्येकी १२५० रुपये आकारण्यात आले होते. ही दोन्ही शिबिरे कोकिलाबेन रुग्णालयाच्या नावे आयोजित केली गेली, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही कंपन्यांनी लसीकरण शिबिर आयोजित करण्याआधी पालिकेच्या विभागांना माहिती दिलेली नाही, असे वांद्रे पश्चिाम विभागाचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.