एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला मंगळवारी ( २० जून ) एक वर्ष झालं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असतं. पण, गद्दारांना बरोबर का ठेवायचं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अंबादास दानवे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असते. फार अवघड काम नव्हते. पण, उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ज्यांच्या मनात गद्दारी रुजली आहे, त्याला माझ्याबरोबर का ठेवायचं. एकनाथ शिंदे गेले, तेव्हा किती लोक होती? संध्याकाळी अर्धे लोक तर उद्धव ठाकरेंबरोबर वर्षा बंगल्यावर बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी ठरवलं असतं, तर काहीही झालं असतं.”

हेही वाचा : मुंबईत ईडीचे धाडसत्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ज्या लोकांचे कनेक्शन…”

“भाजपानेही फोडाफोडी केली”

“एकनाथ शिंदे आणि आमदारांना महाराष्ट्राची सीमा पार करू दिली नसती. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्ता आणि खुर्चीसाठी कोणतेही काम केलं नाही. यांनी गद्दारी केली. भाजपानेही फोडाफोडी केली. हे कार्य मोठे धर्मकार्य करण्यासाठी गेले होते का?,” असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थि केला आहे.

हेही वाचा : “नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्हाला ऑफर होती, पण…”, गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

“शिवसेनेचं बोट पकडून भाजपा महाराष्ट्रात…”

“भाजपाच्या तालावर आणि ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपवण्यासाठी गद्दारी करण्यात आली. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपाने केलं आहे. शिवसेनेचं बोट पकडून भाजपा महाराष्ट्रात फोफावली आहे,” अशी आठवणही अंबादास दानवे यांनी करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.