मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर येथे पायाभूत कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेतला आहे. या ब्लाॅकमुळे अंबरनाथ – कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर कोणताही ब्लाॅक नसेल.
ब्लाॅक कालावधीत ‘ही’ पायाभूत कामे करणार
मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ आणि ४ दरम्यान ४ स्टीलच्या तुळया उभारण्यात येणार आहेत. अंबरनाथ-बदलापूरदरम्यान जुन्या एमआयडीसी जलवाहिनी पुलाच्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असेल.
ब्लाॅक कधी आणि कुठे ?
हा ब्लाॅक शनिवारी रात्री १२.१० ते रविवारी सकाळी ६.५५ पर्यंत असणार आहे. ठाकुर्ली आणि कल्याण फलाट क्रमांक १, १अ, २ आणि ३ दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक असेल. शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असेल.
ब्लाॅकचे परिणाम काय ?
ब्लॉक कालावधीत अंबरनाथ – कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. शनिवारी रात्री उशिरापर्यंत २१ लोकल सेवा करण्यात येणार आहेत. तसेच रविवारी सकाळपर्यंत २७ लोकल सेवा रद्द केल्या जातील. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-डोंबिवली, अंबरनाथ-कर्जत आणि टिटवाळा-आसनगाव स्थानकांदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.
”या” लोकलच्या सेवेत वाढ
- शनिवारी सायंकाळी ७.४२ ची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल कर्जतपर्यंत धावेल.
- शनिवारी रात्री ९.३२ ची ठाणे-बदलापूर लोकल कर्जतपर्यंत धावेल.
- शनिवारी रात्री १०.२४ ची सीएसएमटी-कल्याण लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
”या” लोकल अंशत: रद्द
- शनिवारी रात्री ११.१३ ची परळ-अंबरनाथ लोकल कुर्लापर्यंत धावेल.
- शनिवारी रात्री ९.०४ ची कल्याण-कुर्ला लोकल ठाण्यापर्यंत धावेल.
- शनिवारी रात्री १०.१८ डोंबिवली-सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत धावेल.
- शनिवारी रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
”या” डाऊन लोकल रद्द
- शनिवारी रात्री १०.४९ परळ-अंबरनाथ लोकल
- सीएसएमटीवरून शनिवारी रात्री १०.४२ ची, रात्री १०.५० ची, रात्री ११.०८ ची, रात्री ११.१६ ची, रात्री ११.१८ ची, रात्री ११.३० ची, रात्री ११.४२ ची आणि रात्री ११.५१ ची सुटणारी लोकल रद्द केल्या जातील.
”या” अप लोकल रद्द
कुर्लावरून सुटणारी शनिवारी रात्री १०.२२ ची, कल्याणवरून सुटणारी रात्री ९.१९ ची, अंबरनाथवरून सुटणारी ९.०७ ची, रात्री ९.३५ ची आणि रात्री १०.१५ ची लोकल, बदलापूरवरून सुटणारी रात्री ९.०६ ची, रात्री ९.५८ ची आणि रात्री १०.४० ची लोकल, टिटवाळ्यावरून सुटणारी रात्री १०.०६ ची, रात्री १०.२५ ची आणि रात्री ११.१४ ची लोकल, खोपोलीवरून सुटणारी रात्री १२.३० ची लोकल रद्द असेल.
शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेच्या ”या” लोकल रद्द राहणार
सीएसएमटी येथून सुटणारी शनिवारी रात्री १२.०२ ची, रात्री १२.०८ ची, १२.१२ ची, रविवारी पहाटे ५.१२ ची, पहाटे ५.१६ ची, पहाटे ५.२० ची, पहाटे ५.२८ ची आणि सकाळी ६.३७ ची लोकल रद्द असेल.
- परळ येथून सुटणारी रविवारी सकाळी ६.२५ ची, सकाळी ६.५४ ची लोकल, कुर्लाहून सुटणारी पहाटे ४.४५ ची, पहाटे ४.४६ ची, पहाटे ४.४८ ची, पहाटे ५.२६ ची लोकल रद्द असेल.
- ठाण्याहून सुटणारी रविवारी पहाटे ५.०४ ची, पहाटे ५.२० ची, पहाटे ५.३५ ची आणि सकाळी ६.१५ ची लोकल रद्द असेल.
- कल्याणवरून सुटणारी रविवारी सकाळी ६.०३ ची लोकल, अंबरनाथहून रात्री ३.४३ ची, पहाटे ४.०८ ची, आणि पहाटे ५.१८ ची लोकल रद्द असेल.
- टिटवाळ्यावरून शनिवारी रात्री ३.५६ ची आणि रविवारी सकाळी ६.१३ ची लोकल रद्द असेल.
- कर्जतवरून शनिवारी रात्री २.३० ची आणि रात्री ३.३५ ची लोकल, कसाराहून रात्री ३.५१ ची लोकल रद्द असेल.