scorecardresearch

अमूल दूध दोन रुपयांनी महाग

देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलने दुधाचा दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढवला आहे.

अमूल दूध दोन रुपयांनी महाग
अमूल दूध दोन रुपयांनी महाग

मुंबई : देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलने दुधाचा दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढवला आहे. नवा दर बुधवारपासूनच लागू होणार आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम बंगाल येथे नवे दर लागू होणार असल्याचे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

अर्धा लिटर अमूल गोल्ड आता ३१ रुपये, अर्धा लिटर अमूल ताजा २५ रुपये, तर अमूल शक्ती दुधाच्या अर्धा लिटरच्या पिशवीची किंमत २८ रुपये झाली आहे. दरम्यान, ‘मदर डेअरी’च्या दुधातही दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.