लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : डोंगरीत ११ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी २१ वर्षीय साबीर अब्बास खान (२१) याला अटक केली आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगसह पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी रात्री सडे नऊच्या सुमारास मुलगी आजीच्या घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.