राज्य सरकारच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा

मुंबई राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व उदगीरमध्ये होणाऱ्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांना तर प्रकाशन क्षेत्रातील श्री. पु. भागवत पुरस्कार हा ‘लोकवाङ्मय गृह’ या संस्थेला देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

कथाकार भारत सासणे यांना देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लोकवाङ्मय गृहाला देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार( २०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१( संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१( संस्थेसाठी) मराठी भाषा अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.

‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक सॅबी परेरा आणि डॉ. मृदुला बेळे यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी पुढीलप्रमाणे

कथन, काव्य  विभाग

कवी केशवसुत पुरस्कार – हेमंत दिवटे (पॅरानोया), बहिणाबाई चौधरी पुरस्कार – राजू देसले (अवघेचि उच्चार), राम गणेश गडकरी पुरस्कार – जयंत पवार (लिअरने जगावं की मरावं ?), हरी नारायण आपटे पुरस्कार – भीमराव वाघचौरे (किंजाळकाटे), श्री.ना.पेंडसे पुरस्कार – अविनाश उषा वसंत (पटेली), दिवाकर कृष्ण पुरस्कार – माधव जाधव (चिन्हांकित यादीतली माणसं), ग. ल. ठोकळ पुरस्कार – रुस्तम होनाळे (वऱ्हाडातली बिऱ्हाडं),  अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार – अनुवादक – मिलिंद चंपानेरकर (द ग्रेप्स ऑफ रॉथ), भाई माधवराव बागल पुरस्कार- धनंजय जोशी (सहज),

कथेतर विभाग..

अनंत काणेकर पुरस्कार – अरुण खोपकर (अनुनाद), ताराबाई शिंदे पुरस्कार – डॅनिअल फ्रान्सिस मस्करहान्स (मंच), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार – सॅबी परेरा (टपालकी), न.चिं.केळकर पुरस्कार – डॉ. अक्षयकुमार काळे (गालिब : काळ), लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार – डॉ. शाहू रसाळ (रानफूल, लव्ह बर्डस् आणि..मी), श्री. के. क्षीरसागर पुरस्कार- गंगाधर पाटील (कलाकृती आणि समीक्षा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – उत्तम कांबळे (अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद), शाहू महाराज पुरस्कार-शशिकांत गिरिधर पित्रे (या सम हा) नरहर कुरूंदकर पुरस्कार – औदुंबर सरवदे (बोलीविज्ञान), महात्मा जोतीराव फुले पुरस्कार – डॉ.बाळ फोंडके (करोनाष्टक), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार – अनंत केदारे (वाग्दान), ना. गो. नांदापूरकर पुरस्कार- डॉ. शोभा पाटकर (मना मना दार उघड), कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार- डॉ.राणी बंग व करुणा गोखले (तारुण्यभान), डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार – डॉ. मृदुला बेळे (करोनाच्या कृष्णछायेत), रा. ना. चव्हाण पुरस्कार- संपादक राम जगताप व भाग्यश्री भागवत (मायलेकी बापलेकी), 

बाल-कुमार विभाग..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालकवी पुरस्कार- एकनाथ आव्हाड (शब्दांची नवलाई), भा.रा. भागवत पुरस्कार – शशिकांत बा. पाताडे (भातुकली आणि तीन धमाल बालनाटय़), साने गुरूजी पुरस्कार- डॉ. श्रीकांत पाटील (सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल), राजा मंगळवेढेकर पुरस्कार – वसीमबर्ाी मणेर (मौजे पुस्तक संच १), यदुनाथ थत्ते पुरस्कार- किशोर माणकापुरे (विद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना), ना. धो. ताम्हणकर पुरस्कार – डॉ. वैशाली देशमुख (टीएनएज डॉट कॉम # २), सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार- गजानन यशवंत देसाई (ओरबिन)