मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे कारशेडविरोधातील याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. ३० ऑगस्टला होणारी सुनावणी झाली नसून आता पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने २७ सप्टेंबरची तारीख दिली आहे. सुनावणी लांबत असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : गोरेगावमध्ये पोलिसांनी जप्त केला ८८ लाखांचा गुटखा ; दोघांना अटक

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) आरे कारशेडमध्ये झाडे तोडून पुन्हा कामास सुरुवात केल्यानंतर याविरोधात पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार यापूर्वीच्या आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी करण्यात आली आहे. न्यायालयाने आरेतील झाडे तोडण्यास मनाई केली आहे. दरम्यान ३० ऑगस्टला होणारी सुनावणी झाली नसून ती पुढे ढकलून आता २७ सप्टेंबर ही तारीख पुढील सुनावणीसाठी देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.