भिवंडीमधील केवनी येथील कांदळवन भागात माती आणि राडारोडा टाकून भरणी करणाऱ्या दोघांना कांदळवन कक्ष आणि वन विभागाने अटक केली. त्याचबरोबर भरणीसाठी वापरण्यात येणारा एक डंपरही जप्त करण्यात आला.

हेही वाचा- मुंबई: रूळ ओलांडताना १,९०० जणांनी गमावले प्राण; प्रवाशांचा निष्काळजीपणा, नियोजनात रेल्वे अपयशी

गेल्या काही दिवसांपासून केवनीतील कांदळवनात काही भागात मोठ्या प्रमाणावर माती, राडारोडा टाकून भरणी करण्यात येत होती. कांदळवनातील सुमारे ४०० ते ५०० चौरस मीटर क्षेत्रावर दोन व्यक्तींनी भराव टाकला होता. कांदळवनात भराव टाकण्यात येत असल्याची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालक योगेश कुमार, मदतनीस राकेश कुमार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवनीतील कांदळवनाला २०१५ साली संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. कांदळवनात अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येते. अटक करण्यात आलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही जणांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाण्याचे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांनी दिली.