मेहक प्रभू प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एक नवीन वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू या तरुणीने फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी “हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात सहभागी झालेल्या मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने फ्री काश्मीर (काश्मीर मुक्त करा) पोस्टर झळकावलं होतं. त्यावरून बराच वाद झाला. त्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला असून, भाजपानं त्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत. “कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला. कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या “हातात” मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

आणखी वाचा- “हाच शिवसेनेचा खरा चेहरा”; भाजपाचे भातखळकर यांची टीका

कोण आहे मेहक प्रभू?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहक प्रभूचं पूर्ण नाव मेहक मिर्झा प्रभू असं आहे. १९८२ मध्ये जन्मलेली मेहक प्रभू मुंबईची रहिवाशी आहे. मेहक लेखक असून, लघू कथा लिहिते. कथा लिहिण्याबरोबरच मेहक ब्लॉगही चालवते. ज्यावेळी प्रकरण सत्यही असत नाही. त्याचबरोबर खोटंही असत नाही. तथ्यांमधील चुकीमुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असेल, तेव्हा पोलीस सी रिपोर्ट दाखल करते.