मुंबई : रिक्षा चालकाने एका प्रवाशाला धमकावून लुटल्याची घटना अंधेरी येथे घडली. रिक्षा चालकाने सदर प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील दोन सोन्याच्या आंगठ्या आणि ५ हजार रुपये काढून घेतले. बांगूर नगर पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

जुहू येथे राहणारा तुषार फितकरीवाला (२४) मालाड येथील मोतीलाल ओस्वाल कंपनीत वित्तीय सल्लागार म्हणून काम करतो. तो दररोज सकाळी जुहू येथून रिक्षाने ओशिवरा मार्गे मालाड येथील कंपनीत जातो. त्याने नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी मालाड येथील कार्यालयात जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. रिक्षाचालकाने रिक्षा लिंक रोडवरू हायपरसिटीकडे नेली. तिथून वळण घेऊन अचानक रिक्षा थांबवली आणि तुषारला धमकावून त्याच्याकडील दोन सोन्याच्या आंगठ्या रिंग आणि पाच हजार रुपये असलेली बॅग काढून घेतली. त्यावेळी आसपास कुणी नसल्याने मदतीला कुणाला बोलवता आले नाहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तुषारने प्रतिकारही केला नाही. याप्रकरणी तुषारने बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.