सहा महिन्यांपूर्वी राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःचा गट स्थापन केला. या गटाला त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे. आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असा त्यांच्या गटाचा दावा आहे. आता मनसे देखील दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून राज ठाकरे हेच स्व. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी लवकरच ‘बाळासाहेबांचा राज’ हे नाटक सादर केले जाणार आहे.

ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केले जाणार आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्खक अनिकेत प्रकाश बंदरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले, “महाराष्ट्रातील प्रत्येकालाच राज ठाकरे हेच स्व. बाळासाहेबांचे खरे वारसदार वाटतात. ही जनमाणसांची भूमिका आम्ही नाटकाद्वारे सादर करत आहोत. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात अनेक समान धागे आहेत. व्यंग चित्रकला, हिंदुत्त्वाची भूमिका, वक्तृत्व, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांवर प्रेम करणं, संवेदनशील प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवून पुढे येणं असे एक ना अनेक गुण राज ठाकरे यांच्यात दिसतात. या गुणांची झलक ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून दाखविली जाणार आहे.”

ठाकरे कुटुंबाबद्दल भाजपच्या मनात इतका तिरस्कार का?

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती आहे. या जयंतीदिनाचे औचित्य साधत मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात, दुपारी ४ वाजता नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. दोन तासांच्या या नाटकात दोनच पात्र आहेत. एक बाळासाहेब आणि दुसरे राज ठाकरे. कलाकार सचिन नवरे हे बाळासाहेबांची आणि प्रफुल आचरेकर हे राज ठाकरेंची भूमिका वठविणार आहेत. नाटक द्विपात्री असल्यामुळे या दोहोंच्या अभिनयासोबतच स्क्रिन प्रेझेंटेशनद्वारे काही जुन्या आठवणी देखील जागविल्या जाणार आहेत, अशी माहिती दिग्दर्शक अनिकेत बंदरकर यांनी दिली. या नाटकाला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकाची टीम

“तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?”, राज ठाकरेंच्या उत्तराने पिकला हशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यशैलीत अनेक बदल केले आहेत. पक्षाच्या झेंड्यापासून ते धोरणाबाबत मनसेने अनेक विषयात कात टाकली. हिदुंत्त्वाचा मुद्दा पुढे करुन भोग्यांचा विरोध करणे असेल किंवा अयोध्येत राम मंदिराचा दौरा करणे असेल अशा अनेक विषयांना राज ठाकरे यांनी हात घातलेला आहे.