प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आणि खर्चाचे पुनप्र्राप्तीचे प्रमाण कमी असल्याचे सांगत बेस्ट प्रशासनाच्या ५२ बंद मार्गापैकी ३३ मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मंगळवारी घेतला. यामुळे ५४ बससेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. ५२ बसमार्ग बंद करण्याच्या ‘बेस्ट’च्या निर्णयावर मुंबईत राजकीय वादळ निर्माण झाले होते. रद्द करण्यात आलेले बहुतांश मार्ग शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागातील असल्याची ओरडही करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर सेनेच्या नगरसेवकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत बेस्ट भवन येथे सोमवारी महाव्यवस्थापकांना घेराव घातला होता. त्यानंतर ५२ बसमार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
पूर्ववत झालेल्या बससेवा
१०१-कुलाबा आगार-वाळकेश्वर, ५५-वरळी गाव ते काळाचौकी/श्रावण यशवंते चौक, ७४-डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते मच्छीमारनगर-माहीम, २१६- वांद्रे बस स्थानक(प) ते च्युईगाव, २१९- सांताक्रूझ स्थानक(पू) ते डायंमड मार्केट-बीकेसी, ६३१-कुर्ला स्थानक (प) ते मसरानी इस्टेट, ६३२-कुर्ला स्थानक(प) ते सुंदरबाग, ७०-कुलाबा आगार ते काळाकिल्ला आगार, ६४०-सद्भक्ती मंदिर/जोगेश्वरी(पू) ते श्यामनगर/मजास आगार, ६९६- दहिसर स्थानक(पू) ते केतकीपाडा, ६४-बाबुलनाथ ते महेश्वरी उद्यान, १७५- वीर कोतवाल उद्यान-प्लाझा- प्रतीक्षानगर आगर, ६७८-मानखुर्द ते नानावटी, ३९३-घाटकोपर स्थानक(पूर्व)-आमची शाळा-टिळकनगर, ४२९-घाटकोपर स्थानक(प) ते मिलिंदनगर, ४१२-मुलुंड स्थानक(प) ते घाटीपाडा, ४१६-घाटकोपर स्थानक(प) ते अमृतनगर, ४१७-पार्क साइट वसाहत ते सूर्यानगर, ४१८-विक्रोळी स्थानक(प) ते कैलाश कॉम्प्लेक्स नागबाबा मंदिर, ४०७-केळकर महाविद्यालय ते निमकर सोसायटी, ३७०- म्हाडा बस स्थानक ते केळकर महाविद्यालय, ४९५ मर्या. ठाणे स्थानक (पू) ते मुलुंड (पू), ३८४- सांताक्रूझ आगार ते घाटकोपर बस स्थानक, ४५६- मालवणी आगार ते शिवशाही प्रकल्प, ६३४-मालाड आगार ते दामूनगर, २८३-कांदिवली स्थानक(प) ते संतोषनगर.
४४४ मर्या.- घाटकोपर बसस्थानक ते गोरेगाव आगार, ५१८ मर्या.-शिवाजीनगर आगार ते घणसोलीगाव, ९३ मर्या-मंत्रालय ते गोवंडी बस स्थानक,
सी-४६-जलद-मरोळ आगार-लोढा पॅरेडाइज-ठाणे, सी-५५-जलद वांद्रे आगार-सीबीडी बेलापूर, शिवडी फेरी-१ प्र. ठाकरे उद्यान(शिवडी) ते परळ एस.टी.आगार मार्ग, डीडीआर-३ वरळी डेपो ते कबूतरखाना, ६३१ (वर्तुळाकार) कुर्ला स्टेशन ते कुर्ला स्टेशन, अशा या सेवा असतील, अशी माहिती बेस्टच्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
३३ मार्गासह ‘बेस्ट’च्या ५४ बससेवा पूर्ववत
प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आणि खर्चाचे पुनप्र्राप्तीचे प्रमाण कमी असल्याचे सांगत बेस्ट प्रशासनाच्या ५२ बंद मार्गापैकी ३३ मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मंगळवारी घेतला
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 04-05-2016 at 02:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus service