मुंबई महापालिकेवर अखेर शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची एकूण १७१ मते पडली. महाडेश्वर यांनी काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांचा पराभव केला. लोकरे यांना अवघी ३१ मते मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणूक प्रक्रियेला आज दुपारी १२ च्या सुमारास सुरुवात झाली. भाजपने कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता स्थापन होईल, हे निश्चित झाले होते. महापौरपदी शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर विराजमान होतील, हेदेखील निश्चित होते. मतदानावेळी भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा दिला. शिवसेनेचे ८४ आणि अपक्ष ४ आणि भाजपचे ८२ आणि इतर २ अशा एकूण १७१ जणांनी विश्वनाथ महाड़ेश्वर यांच्या बाजुने मतदान केले. तर काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ३१ मते मिळाली.

शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचीच सभागृहनेतेपदी निवड होईल, हे निश्चित झाले आहे. यासोबतच, स्थायी, सुधार, शिक्षण, आरोग्य या समित्यांच्या सदस्यांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईचे महापौरपद शिवसेनेलाच मिळाले आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिले. महापौर निवडणुकीत सहभागी होण्यापूर्वी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन पारदर्शकतेची शपथ घेतली. भाजपच्या ८२ आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी महाडेश्वर यांनाच पाठिंबा दिला.

LIVE UPDATE: 

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचा जल्लोष

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना १७१ नगरसेवकांचा पाठिंबा

मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई महापौर निवडीसाठी आवाजी मतदान

भाजपचा शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा

महापौरपदाच्या निवडणुकीला मनसेचे नगरसेवक गैरहजर

भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा

महापौर निवडीची मुख्य प्रक्रिया सुरु

मुंबई महापौरपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2017 mumbai mayoral poll election shivsena bjp mns congress ncp
First published on: 08-03-2017 at 12:41 IST