मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई झालेली नसल्याचा दावा विरोधकांनी के लेला असला तरीही मुंबईतील मोठय़ा नाल्यांतील १०४ टक्के  गाळ उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मोठय़ा नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे, असे पालिके चे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी मुंबई महानगरातील मोठय़ा नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधून गाळ काढण्याबाबतचे उद्दिष्ट ठरविले जाते. या आधारावर यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने के ला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नाल्यांतून ७५ टक्के गाळ उपसा के ला जातो, १० टक्के गाळ उपसा पावसाळ्यात तर १५ टक्के गाळ उपसा पावसाळ्यानंतर के ला जातो. पावसाळ्याआधीचा ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे काम मे महिन्याअखेरीस पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका गाळ काढून १९ हजार ९३ इतक्या वाहनफे ऱ्यांद्वारे तो वाहून नेण्यात आला आहे, असे पर्जन्यजल वाहिन्या विभागाचे म्हणणे आहे.  इतकेच नाही तर  जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात १७ हजार २९७ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.

नालेसफाई नसून हातसफाई असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी या पूर्वी के ला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc over nullah cleaning bmc claim 100 percent drains cleaning zws
First published on: 09-06-2021 at 03:47 IST