मुंबई : शीव येथील मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील आंतरुग्णांना दररोज दोन वेळच्या जेवणात  चार चपात्या देण्यासाठी नव्याने कंत्राट देण्यात येणार आहे. रुग्णालयात सरासरी १७०० आंतररुग्ण असून त्यांच्यासाठी दररोज ६८०० चपात्यांची आवश्यकता आहे. पुढील तीन वर्षांसाठी चपात्या पुरवण्याकरिता दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कंत्राट देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आंतररुग्णांना दोन वेळेस मोफत जेवण दिले जाते. या जेवणात दररोज सकाळी व रात्री मिळून चार चपात्या दिल्या जातात. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाला चपात्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत १६ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. आधीच्या कंत्राटानुसार प्रति चपाती दोन रुपये ६५ पैसे असा दर होता. त्या आधारे महानगरपालिकेने पुढील तीन वर्षांसाठी चपात्या पुरवण्याकरिता जुलै महिन्यात निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला केवळ दोनच निविदकारांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निविदेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र पुन्हा दोनच निविदकारांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यातून एका कंत्रातदाराची निवड करण्यात आली असून हा कंत्राटदार दोन रुपये ७५ पैसे या दराने चपात्या पुरवणार आहे. या कामासाठी महानगरपालिकेने दो कोटी चार लाख ९५ हजार २०० रुपयांचे कंत्राट देण्याची शिफारस केली आहे.