मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी नगर येथील एका ११२ क्रमांकाच्या मदत वाहिनीवर आला होता. ही दोन आठवड्यामधील दुसरी घटना असून तपासणीत कोणतीही संशयीत वस्तू सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>> नायरमध्ये लेप्टो व हेपेटायटीसनमुळे १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. अन्यथा बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. दूरध्वनी करणारी व्यक्ती नगर येथून बोलत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधीत व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांक ११२ क्रमांंकावर दूरध्वनी करुन धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.