मुंबई : कांदिवलीमधील एका उद्यानात खेळणाऱ्या मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही मुलींच्या पालकांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी केली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी त्याच परिसरात रहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला अटक केली.
कांदिवली येथील एका उद्यानात पाच वर्षांच्या मुलीचा एका व्यक्तीने विनयभंग केला होता. हा प्रकार २९ मे रोजी घडला होता. मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. याच परिसरात राहणारी ५९ वर्षीय व्यक्ती या मुलीचा विनयभंग करीत होती. आरोपीने २१ मे रोजी आरोपीने फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीच्या ५ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलांच्या पालकांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.