मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक सुरळीत करावे, तसेच शेवटची गाडी रात्री उशीरा करावी अशा विविध मुद्दय़ांवर मुंबईतील खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ते शुक्रवारी प्रथमच मुंबईत आले होते. यावेळी खासदारांनी त्यांची भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक चांगलीच कोलमडली आहे तसेच रेल्वेच्या विविध समस्यांबाबत खासदार पूनम महाजन, किरिट सोमय्या तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रभू यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाजन यांनी रेल्वेच्या गोंधळाबाबत समस्या मांडल्यावर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीही काही तांत्रिक कारणे मांडली. यावर प्रभू यांनी केंद्राकडून काही मदत लागेल ते सांगा आणि पण प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा असे प्रभू यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. योवळी खार, कार्टर रोड येथील रेल्वे वसाहतींबाबतही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, रात्री उशिरा प्रभू मातोश्रीवर गेल्याचे समजते.