चांदीवाल आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समन्स बजावले आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे. अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आपली प्रतिमा खराब होत असल्याचे सचिन वाझेने म्हटले होते. त्यानंतर आता चांदीवाल आयोगाकडून मलिकांकडे विचारणा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडतर्फे पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांनी अँटिलिया प्रकरणामागे मी आणि परमबीर सिंह असल्याचे म्हटले आहे. अशा वक्तव्यामुळे प्रतिमा खराब होत आहे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. त्यामुळे आयोगाने त्यांना समन्स बजावून चौकशी करावी. त्यामुळे ते कोणत्या आधारावर आरोप करत आहे हे स्पष्ट होईल अशी मागणी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर केली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया  इमारतीजवळ एका गाडीमध्ये स्फोटके सापडली होती. गाडीमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे एक पत्र सापडले होते. त्यानंतर ५ मार्च रोजी या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. अँटिलिया स्फोटकेप्रकरणात मुंबई पोलिसातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचेही नाव आहे.

या प्रकरणाच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे  होते. यानंतर मार्चमध्ये परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईतील बार, रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandiwal commission summons maharashtra min nawab malik on feb 17 abn
First published on: 15-02-2022 at 20:44 IST