मुंबई: राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हा कळीचा मुद्दा बनू लागला असून वाढते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी परिवहन विभागाकडून रस्ते ‘सुरक्षा अभियाना’चे आयोजन करण्यात येते. नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात बुधवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात येणार होती. केवळ अध्र्या तासाच्या या नियोजित कार्यक्रमासाठी तीन तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्री आले नाहीत. यामुळे कंटाळलेले अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. अखेर कार्यक्रमासाठी आलेले राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

परिवहन विभागाच्या ‘राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२३’ला ११ जानेवारीपासून करण्यात आली आहे. हे अभियान राज्यात सात दिवस चालणार आहे. परिवहन विभागातर्फे राज्यात विशेष कारवाई, जनजागृती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ िशदे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ११ वाजता एनसीपीए सभागृहात करण्यात येणार होते. मात्र मंगळवारपासूनच या कार्यक्रमाच्या वेळेत सातत्याने बदल करण्यात आला.मुख्यमंत्री येण्यापूर्वी जॅकी श्रॉफ यांनी रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मागदर्शन केले. मात्र बराच वेळ होऊनही मुख्यमंत्री न आल्याने आणि मुख्य कार्यक्रम सुरू होण्यासही विलंब झाल्याने जॅकी श्रॉफ निघून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘खराब रस्त्यांमुळे अपघात’
रात्रीअपरात्री प्रवास, बेदरकारपणे वाहन चालविणे, वाहतूक कोंडी याचा अनुभव नेहमीच आम्हाला येतो. त्यातच गेल्या तीन-चार महिन्यांत काही आमदार रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. यामुळे वाहनचालकाची विश्रांती, त्याच्या कामाची अधिकची वेळ, रात्रीअपरात्री प्रवास टाळणे गरजेचे आहे. यासंदर्भात शिस्त लावण्याची गरज आहे, असे मत शंभुराज देसाई यांनी रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले. खराब रस्त्यांमुळे अपघात ही जबाबदारी शासनाची असून ती आम्हाला मान्य आहे. तेथे संबंधित विभागाने खास करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.