सीमाशुल्क चुकवून चीनमधून आलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कंटेनर २०२२ मध्ये ताब्यात घेऊन शिवडीतील गोदामात ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> उमेदवार नसलेल्या पक्षाला ‘शिवाजी पार्क’; मनसेला सभेसाठी परवानगी

चंद्रशेखर रासबिहारी सिंह हे पवईतील सीमाशुल्क विभागात मूल्य निरुपक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते शिवडीतील एमओडी एमबीपीटी येथे आहे. फेब्रुवारी २०२२ रोजी चीन येथून आयात करण्यात आलेला कपड्याचा कंटेनर सीमाशुल्क विभागातील अधिकार्‍यांनी जप्त केला होता. कपडे असलेला हा कंटेनर शिवडीतील सीमाशुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत अज्ञात चोराने गोदामात शिरून करून चोरी केल्याचा संशय आहे. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत विविध कंपन्यांचे आठ कंटेनर बाहेरगावाहून आले होते. सीमाशुल्क न भरल्यामुळे हे कंटेनर आणि त्यामधील वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >>>अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड, लैलाच्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कंटेनरमधील काही माल चोरीस गेल्याचे नंतर उघडकीस आले होते. पंचनामा करताना ओम साई इंटरप्रायजेस कंपनीने आयात केलेला माल आणि चोरीनंतर झडती घेण्यात आलेल्या मालामध्ये प्रचंड तफावत दिसून आली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने संबंधित कपड्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार उघडकीस येताच सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती. गेल्या दीड वर्षांत सुमारे ४२ लाख ४२ हजार १०४ रुपयांच्या कपड्यांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा एक अहवाल नंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत या अधिकार्‍यांनी चंद्रशेखर सिंह यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी शिवडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.