शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत एक समिती गठीत करण्यात आली आहे. यात माजी आमदार जे.पी गावित आणि आमदार विनोद निकोल यांची नियुक्ती केली आहे. समितीने एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तसेच, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी, कष्टकरी, अंगवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासह एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. “बैठकीतील सर्व मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे. झालेल्या सर्व निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी सभागृहात सांगितलं.

हेही वाचा : “…तर थाळी वाजवून पुढचा कार्यक्रम करणार”, जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संघटना आक्रमक

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

  • अंगणवाडी सेविकांचा पगार ८३२५ रूपयांवरून १० हजार
  • छोट्या अंगवाडी सेविकांचा पगार ६२०० रूपयांवरून ७ हजार
  • अंगवाडीतील मदतनीसांचा पगार ४४२५ वरून ५५०० रूपये
  • अंगणावाडी सेविकांची २० हजार पदे भरण्यात येणार
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळण्याबाबत अभ्यास करून कारवाई करणार
  • कामगार कल्याण विभागाची रिक्त पद भरण्यात येणार
  • गट प्रवर्तकांना पगार १४००० हजार रूपये करणार
  • संजय गांधी आणि श्रावण वाळ योजनेतून १५०० रूपये मिळणार
  • कांद्याला प्रति क्विंटल ३०० रूपयांवर ३५० रुपये सानुग्रह अनुदान वाढ
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee regarding farmers issues withdraw the agitation say cm eknath shinde ssa
First published on: 17-03-2023 at 19:08 IST