मुंबई, नागपूर : ‘बटेेंगे तो कटेंगे’ या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर राज्याच्या निवडणूक प्रचारात जोर देऊन भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला असतानाच काँग्रेसने ‘जुडेेंगे तो जितेंगे’या उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय ठरलेल्या घोषणेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘बटेंगे विरुद्ध जुडेंगे’ ही हिंदी पट्ट्यातील घोषणा राज्याच्या निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आली आहे.

उत्तर प्रदेशामधील विधानसभेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतांच्या ध्रुवीकरणाकरिता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आदित्यनाथ यांनी मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला समाजवादी पार्टीने ‘जुडेेंगे तो जितेंगे’ प्रत्युत्तर दिले आहे. तर ‘जुडेंगे तो आगे बढेंगे’ असे प्रत्युत्तर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

राज्यातील निवडणूक प्रचारात योगी आदित्यनाथ यांनी या ‘बटेेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आहे. योगींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये या घोषणेचे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. भाजपकडून वातावरणनिर्मितीसाठी या घोषणेचा वापर केला जात असतानाच काँग्रेसच्या वतीने ‘जुडेंगे तो जितेंगे’ने प्रत्युत्तर दिले जाईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. ‘बटेेंगे तो कटेंगे’ याचा अर्थ मतांचे विभाजन झाल्यास पराभव अटळ, असा युक्तिवाद भाजपकडून करण्यात येत आहे. अल्पसंख्याकांचे एकगठ्ठा मतदान होते. त्यावर बुहसंख्यांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशी योगी आदित्यनाथ यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते.मात्र, बटेंगे विरुद्ध जुडेंगे या हिंदी पट्ट्यातील घोषणा राज्यातील मतदारांना कितपत प्रभावित करतील याबाबत साशंकताच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समान कार्यक्रमांतर्गत महायुतीतअजित पवार

‘भाजपबरोबर महायुतीमध्ये समान कार्यक्रमांतर्गत आहोत. राज्याचा विकास व्हावा, यासाठी महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत,’ अशी भूमिका भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.