मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामाला अखेर आजपासून सुरुवात होणार आहे. डोंबिवलीतील प्रीमियर मैदानातील एका सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे कामाचा आरंभ केला जाणार आहे.

एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘मेट्रो १२’ प्रकल्प. २०.७५ किमी लांबीची कल्याण – तळोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवर १९ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेची विस्तारीत मार्गिका आहे. त्यामुळे ‘मेट्रो १२’ मार्गिकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहे.

हेही वाचा…पालिकेच्या शाळेतील शिक्षक कचाट्यात, दोन दिवस निवडणुकीचे काम चार दिवस शाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो १२ मार्गिकेसाठी

नवी मुंबईतील पिसार्वे येथील एका खासगी जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आले होते. खासगी मालकीची आहे. ती जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, तसेच त्यासाठी बराच निधी लागणार असल्याने एमएमआरडीएने कारशेडसाठी नवीन जागा शोधली आहे. त्यानुसार निळजे-निळजेपाडा येथे अंदाजे ४५ हेक्टर जागा शोधून ती ताब्यात घेण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेचे काम सुरु होण्यापूर्वीच कारशेडचा प्रश्न मार्गी लागलेली ही पहिली मेट्रो मार्गिका आहे. दरम्यान या मार्गिकेच्या कामासाठी गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि वेल्सपून इन्टरप्रायझेस लिमिटेड या तीन कंपन्यांकडून निविदा सादर करण्यात आल्या होत्या. त्यात गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडने बाजी मारली आहे. या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून आता य मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होत आहे.