नव्या १२८ रुग्णांचे  निदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून दैनंदिन नव्या आढळणारी रुग्णसंख्या आता दीडशेच्याही खाली गेली आहे. मुंबईत शुक्रवारी १२८ रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवारी शहरात २०० रुग्ण बरे झाले आहेत. करोनाच्या मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. या महिन्यात सात वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात दिवसभरात नवे ९७३ रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात ९७३ नवीन करोना रुग्ण आढळून आले असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात २५२१ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ८६८८ इतकी झाली आहे.

राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ६२ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ४६२९ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ४४५६ रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे शहर २१, नवी मुंबई २३, कल्याण-डोंबिवली ९, नाशिक २३, अहमदनगर ४४, पुणे ७६, पुणे शहर २०६, पिंपरी-चिंचवड ६३, नागपूर २६ याप्रमाणे नवीन रुग्णांची नोंद झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient corona death rate in mumbai akp
First published on: 26-02-2022 at 00:57 IST