मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच शिंदे समर्थक आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. या मेळाव्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची झलक पहायला मिळाली. मात्र मेळाव्यातील भाषणापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या एका विधानावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…”

झालं असं की, मेळाव्यामध्ये शिवसेनेतील फुटीर आमदारांचा सातत्याने ‘गद्दार’ असा उल्लेख करणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना ‘कुणी केली गद्दारी?’ असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. दसरा मेळाव्यातून मुंबई आणि महानगर क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे एकप्रकारे रणशिंगच या विधानाच्या माध्यमातून फुंकल्याचे चित्र पहायला मिळालं. या आपल्या पहिल्याच मेळाव्यात भाषणासाठी उभे रहाण्याच्या काही तासांपुर्वी म्हणजेच दुपारी चार वाजून २९ मिनिटांनी शिंदे यांनी एक ट्वीट केलं होतं.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी शिंदेंनी ट्वीट केल्या होत्या. त्यांनी ‘विचारांचे वारसदार’ हा हॅशटॅगही वापरला होता. त्यांनी हे ट्वीट करत घराणेशाहीच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांची कोंडी करण्यासाठी वातावरण निर्मीती केली होती. आपल्या मेळाव्यामधील भाषणामध्येही हाच मुद्दा पुढे नेत उद्धव यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काय केले असा सवाल करत शिंदे यांनी नोकर आणि मालकाचा संदर्भ देत केला. यामधून शिंदे यांनी शिवसैनिकांची सहानभूतीही मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

त्यानंतर सायंकाळी आठच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरुन भाषणाला सुरुवात केली. मात्र उद्धव यांचं भाषण सुरु असतानाच अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंनी केलेलं हे ट्वीट कोट करुन रिट्वीट करत प्रतिक्रिया नोंदवली. “याच बदलाची आज महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे. आपल्या राज्याला आणि देशाला जो बदल पाहण्याची अपेक्षा आहे तो तुम्हीच आहात एकनाथ शिंदेजी,” असं अमृता यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

दरम्यान उद्धव ठाकरेंचं भाषण संपत असतानाच बीकेसीच्या मैदानात भाषण सुरु केल्यानंतर एकनाथ शिंदे जवळजवळ दीड तास बोलत होते. यामध्ये त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सोबत केलेली आघाडी, भाजपाशी मोडलेली युती आणि हिंदूत्वाच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केलीच. मात्र ही टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा प्रचार भाजपाच्या वाटेनेच पुढे चालेल हे देखील स्पष्ट होऊ लागले आहे.