मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामधून लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी वडील चोरले या आरोपाला उत्तर दिलं आहे. या भाषणामध्ये शेवाळेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस ‘मातोश्री’वरुन आलेल्या आदेशांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

आदित्य ठाकरेंनी केलेल्या खोके घेतल्याच्या आरोपांवरुन उत्तर देताना शेवाळे यांनी, “याच युवराजांना आम्ही सांगू इच्छितो की, छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्ही सर्वजण शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिलो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की किती खोके आम्हाला त्यावेळी दिले,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शेवाळे यांनी राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला मातोश्रीवरुन राज यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आणि त्यांना शिव्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याचा उल्लेख केला.

1900 crore loan guarantee before code of conduct Rulings for Sugar Factories Mumbai
आचारसंहितेपूर्वी १,९०० कोटींची कर्जहमी; सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांसाठी घाईघाईने निर्णय
All shares of Adani Group suffered a sell off on news of a America government probe into suspected bribery
लाचखोरीप्रकरणी अमेरिकी सरकारच्या चौकशीचे वृत्त;‘अदानी’च्या सर्व समभागांना गळती
Additional water cut in Mumbai on Tuesday
मुंबईत मंगळवारी अतिरिक्त पाणी कपात
bmc removed 12000 hoarding in two days get orders to strictly follow code of conduct
दोन दिवसांत १२ हजार फलक काढले;आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”

“२००५ मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्ही आम्ही शिवसेनेला साथ दिली. शिवसेनाप्रमुखांना साध दिली. तेव्हा किती खोकी दिली याचाही आम्हाला हिशोब मिळायला पाहिजे. तेव्हा तर आम्हाला असे आदेश होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा. कार्यालयावर मोर्चे काढा, त्यांना शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, असे आरोप आम्हाला ‘मातोश्री’वरून वारंवार येत होते,” असं शेवाळे म्हणाले.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

तसेच शेवाळे यांनी नारायण राणेंच्या घरावर हल्ला करण्यासाठी ‘मातोश्री’वरुन आदेश आल्याचाही दावा केला. “नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्हाला असेच आदेश यायचे की, चेंबुरचे कार्यालय फोडा. माझी पत्नी इथं उपस्थित आहे. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी रुग्णालयात होतो. त्याचा फक्त चेहरा बघितला आणि लगेच साहेबांचा ‘मातोश्री’वरुन आदेश आला की, कणकवलीला जा आणि नारायण राणेंविरोधात सभा घ्या. लगेच आम्ही बॅग भरून त्या सभेला गेलेलो. आयुष्यातील एवढे महत्त्वाचे क्षण आम्ही संघटनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी दिले. त्या क्षणांची किंमत कधीच खोक्यात होऊ शकत नाही,” असं भावनिक विधान शेवाळेंनी केलं.