फिरण्यासाठी मुंबईत आलेल्या दिल्लीतील फॅशन डिझायनरवर तिच्या व्यावसायिक मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने यासंदर्भात खार पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (A) (लैंगिक छळ), ३५४ (B) (कपडे उतरवण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), ३२३ (जाणीवपूर्वक दुखापत करणे), ५०९ (विनयभंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दी प्रिंटने पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

२८ वर्षीय दिल्लीतील फॅशन डिझायनर फिरण्याकरता मुंबईत आली होती. मुंबईत पहिल्यांदाच आली असल्याने तिने तिच्या मित्राकडे राहण्याचा निर्णय घेतला. खार येथे राहणाऱ्या तिच्या व्यावसायिक मित्राच्या घरी ती राहिली. मात्र, मित्राने तिचा विश्वासघात केला. या मित्राने तिच्यावर बलात्कार करून तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

हेही वाचा >> वडिलांनी पत्नीवर बलात्कार केल्यानंतर पतीनं आई म्हणत दूर लोटलं आणि मग.. पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मित्रानेच विश्वासघात केल्यानंतर तिने तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. परंतु, आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेतला जात असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.