अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग पहिल्यांदा येत असेल. पण, माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे शरद पवार यांची माझ्यासह सर्वांनी सेवा केली. ही सेवा करताना शरद पवार विठ्ठलासारखं आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं राहिलं. मग, हा निर्णय घेताना किती वेदना होत असतील, याची जाणीव मला होत आहे, असं भावूक भाषण मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा धनंजय मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, “२०१४ नंतर पक्षावर वाईट परिस्थिती आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी ही पक्षाची जबाबदारी घेतली. पुन्हा पक्ष जिवंत करण्याचं काम केलं. ४० आमदारांची संख्या २०१९ साली ५४ पर्यंत पोहचली.”

हेही वाचा : शरद पवार की अजित पवार, कोणाची कायदेशीर बाजू भक्कम? असीम सरोदे म्हणाले…

“आयुष्यभर राजकारण करताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने शरद पवारांचा शब्द ओलांडला नाही. आज हा निर्णय घ्यावा लागतोय, ही गुगली तर नाही. सर्वात जास्त अपमान आणि मान खाली घालावी लागली, ठेच खाव्या लागल्या ते म्हणजे अजित पवार आहेत. चांगली संधी मिळाली असताना शरद पवारांच्या शब्दांवर अन्य सहकाऱ्यांना देण्याचं काम अजित पवारांनी केलं,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

“ऊसतोड मजूराच्या पोटी जन्माला आलेल्या, घरातून आणि पक्षातून बाहेर काढलेल्या माझ्यासारख्या माणसाला बोलण्याची ताकद अजित पवारांनी दिली. पण, अजित पवारांनी कधीतरी मन मोकळे करावे. किती दिवस तुमच्या मनात असंख्य प्रसंग आणि अपमान मनात ठेवणार आहात. अजित पवारांनी त्यांच्या सावलीलाही मनातलं दु:ख सांगितलं नाही. कधीतरी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं लागेल,” अशी साद धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना घातली आहे.

हेही वाचा : VIDEO: “कायदे आम्हालाही कळतात, त्यामुळे जे लोक…”, छगन भुजबळ कडाडले, म्हणाले, “शरद पवारांनंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काहीही झालं तरी अजित पवारांवर टीका करण्यात येते. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांना बदनाम करण्यात आलं. अजित पवार सर्व गोष्टी सहन करत राहिले,” असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.