डोंबिवलीमधील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आणि गद्रे बंधू यांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे यंदाही पर्यावरणस्नेही आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजित करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिवर्षी डोंबिवलीतील एखाद्या हॉलमध्ये संपन्न होणारी कंदील कार्यशाळा या वर्षीच्या करोना महामारीमुळे ऑनलाईन माध्यातून (झूम मीटिंगद्वारे) शनिवार दिनांक सात नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत एका कंदिलाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल आणि दुसर्‍या कंदिलाची व्हिडीओ लिंक देण्यात येईल. दोन्ही कंदिलाचे साहित्य शिबीरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना कुरिअरने पाठविण्यात येईल.

ज्या इच्छूकांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या गूगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करुन तो भरून द्यावा. या फॉर्ममध्ये देण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये कार्यशाळेसाठीचे प्रवेश शुल्क ऑनलाईन फंड ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करावे. अधिक माहितीसाठी प्राची शेंबेकर यांच्याशी ९०२९२२०५५१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. प्रवेश मर्यादित असल्याने आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन या उपक्रमाच्या प्रमुख सोनाली गुजराथी यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly lantern making workshop in dombivili
First published on: 28-10-2020 at 16:41 IST