मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय युनिटने बेकायदेशीर ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणासंदर्भात मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुरुग्राममधील एकूण सात ठिकाणी छापे टाकले.

फॉरेक्स मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ऑक्टाएफएक्स ट्रेडिंग ॲप आणि संकेतस्थळावर आंतरराष्ट्रीय दलालांचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली होती. पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएस ऑक्टाएफएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ऑक्टाएफएक्सने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय भारतात काम केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करून एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचे ईडीने सांगितले. या प्रकरणात, ईडीने आतापर्यंत १६० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.