मुंबई : पुणे स्थित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना डिसेंबर २०२२ मध्ये विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भोसले यांच्या टाच आणलेल्या मालमत्तांवरील निर्बंध हटवण्याबाबतची विनंती राज्य शासनाच्या संबंधित विभागाला केली आहे. ईडी मुंबई परिमंडळ-२ कार्यालयाने १२ जून रोजी पुणे येथील नोंदणी महानिरिक्षक आणि मुद्रांक नियंत्रकांना पत्र लिहून ‘एआरए’ मालमत्ता आणि अविनाश भोसले यांच्याशी संबंधित प्रकरणात टाच आणण्यात आलेल्या मालमत्तांवरील सर्व निर्बंध हटवण्याची विनंती ‘रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प’ विभागाच्या महानिरीक्षकांना केली आहे.

आरा प्रॉपर्टीज आणि अविनाश भोसले यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ७ ऑगस्ट २०२१ रोजी, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, रेंज हिल कॉर्नर, गणेशखिंड, पुणे एमएच, ४११००७ या मालमत्तेवर तात्पुरती टाच आणली होती. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देऊन या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आणले होते.

दरम्यान, विशेष न्यायालयाने ६ डिसेंबर २०२२ आणि १२ एप्रिल २०२३ रोजी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच यंत्रणेने तपास बंद करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.